नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगीवेत मुलांचं भेटकार्ड देवून स्वागत

Edited by:
Published on: June 16, 2023 19:07 PM
views 248  views

कणकवली : नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नादगीवे मध्ये शैक्षणिक वर्ष 2023 - 24 च्या प्रथम दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प, चॉकलेट आणि भेटकार्ड देवून  करण्यात आले. आदर्श परिपाठ कसा असावा  हे विद्यार्थ्यांना कळावे म्हणून शाळेतील शिक्षक वर्गाने परिपाठ घेतला. शैक्षणिक वर्ष 2023-24 चे  नियोजन कसे असेल या विषयी मुख्याध्यापक  कौस्तुभ देसाई यांनी माहिती दिली.

तसेच शाळेत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नव्याने हजर झालेल्या शिक्षकांची देखील ओळख करुन देण्यात आली.नियोजित वेळापत्रका नुसार तासिका घेण्यात आल्या.नविन अभ्यासक्रमाची ओळख विद्यार्थ्यांना झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण होते.शेवटच्या 2 तासिकां मध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीसंस्थेचे पदाधिकारी राजेंद्र ब्रम्हदंडे,मोहन कावळे,परवेझ पटेल उपस्थित होते.