
कणकवली :कणकवली नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे खारेपाटण चा निकाल शंभर टक्के लागला असून शुभंकर सुधीर कुबल याने 94.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रणिल राजेश शिंदे 90.40% गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच निशा संदीप रायका हिला 87.60% गुण मिळाले आहेत व अहमद अमजद मुकादम याला देखील 87.60% गुण मिळाले असून दोघांनाही तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन मनोज गुळेकर, सेक्रेटरी मोहन कावळे , मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई व समन्वयक पराग शंकरदास यांच्यासह संचालक, शिक्षक वर्गातून विद्यार्थ्यांवर अभिनंदन पर शुभेच्छांचा वर्षा होत आहे .