राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या सदस्यपदी डॉ. आनंद बांदेकर

Edited by: दिपेश परब
Published on: February 01, 2024 14:24 PM
views 171  views

वेंगुर्ला : केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० लागू करण्यात आले आहे. या शिक्षण धोरणाची राज्यात अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF) निर्मिती होय.

राष्ट्रीय अवलोकन आराखड्याचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा समावेश शिफारस व मार्गदर्शन तसेच ५+३+३+४ या रचनेतील शैक्षणिक कार्याचे सनियंत्रण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णायाद्वारे सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ आनंद बांदेकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्थरावरून अभिनंदन होत आहे.