नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे मध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स दिन..!

यशाला कोणताही मधला मार्ग नाही : डॉ. पुजा कलगे
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 01, 2023 20:53 PM
views 130  views

कणकवली : नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे  मध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा  करण्यात आला. या वेळी कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ पूजा कलगे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण कष्ट केलेच पाहिजेत कष्टाशिवाय पर्याय नाही जेवढे कष्ट जास्त कराल तेवढा चांगलं यश प्राप्त होईल आणि त्याचा आनंद खूप मोठा असेल असे डॉ. कलगे यांनी सांगितले

या वेळी प्रशालेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ मानपत्र आणि तुळशीचे रोप देवून सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या यशस्वी व्हायचं असेल तर यशाला कोणताही मधला मार्ग नाही त्याला कष्ट हाच पर्याय आहे.शिक्षक प्रतिनिधि म्हणून तेजश्री भोकरे यांनी डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाची सांगता शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांच्या भाषणाने झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 10 वी तील विद्यार्थिनी महवीश मुल्ला आणि जोया पटेल यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.