
सिंधुदुर्ग : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेतून राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगट पर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगिन आरोग्य तपासणीसाठी करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे उद्या शनिवारी 1 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता कुडाळ येथील बॅ. नाथ पै. सेंट्रल स्कुल एमआयडीसी येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेतून राज्यातील ० ते १८ वर्षे वयोगट पर्यंतच्या बालके तसेच किशोरवयीन मुला-मुलींच्या सर्वांगिन आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगरविकास यांच्या समन्वयाने मोहिम राज्यस्तरावर राबविणेचे निश्चित करणेत आले आहे. त्यानुसार सदर उपक्रम राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणार आहे. यामध्ये ० ते १८ वर्षे पर्यंतच्या बालकांची / किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणे, आजारी आढळलेल्या बालकांवर त्वरीत उपचार करणे, गरजू आजारी बालकांना संदर्भसेवा देवून उपचार, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधा पुरविणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्यात येणार आहे.वैद्यकिय अधिकारी महिला, वैद्यकिय अधिकारी पुरुष, औषधनिर्माता, आरोग्य सेविका हे या तपासणी पथकामध्ये असणार आहेत. या तपासणीमध्ये उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या बालकांना शासकिय रुग्णालय, महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करारबध्द रुग्णालय व आरबीएसके करारबध्द रुग्णालयांमध्ये संदर्भित करणेत येणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकिय अधिकारी (बाहय संपर्क) डॉ. सुबोध इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक राजेश पारधी व सांख्यिकी अन्वेषक विश्वनाथ राव हे कार्यक्रमाचे नियोजन करित आहे.