नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचं 47 वं वर्ष
Edited by:
Published on: November 16, 2024 20:48 PM
views 144  views

कणकवली : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची मानाची नाथ पै एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. कोकणचे थोर सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै यांची चिरंतन स्मृती जपणारी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेने सन 1978 पासून प्रवासाला सुरुवात केली, सर्वोत्तमतेचा ध्यास घेत वेगळेपणाची कास धरत गेली 46 वर्ष न थांबता अविरतपणे ही चळवळ चालू ठेवली आहे. स्पर्धेचे यंदाचे हे 47 वे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी काही मोजक्या स्पर्धेतील ही स्पर्धा आहे. संस्थेच्या या स्पर्धेमुळे कणकवलीतील जाणकार रसिक प्रेक्षकांना सर्वोत्तम प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध होते. शालेय व खुल्या असे दोन गटांमध्ये घेण्यात येणारी ही एकमेव स्पर्धा असून या स्पर्धेतील खुल्या गटासाठी *प्रवेश फी रुपये 2000/- तर शालेय गटासाठी प्रवेश फी रुपये 1000 व* पूर्ण भरलेला प्रवेश अर्ज सादर केल्यानंतर संघांचा स्पर्धेतील प्रवेश निश्चित करण्यात येईल. *स्पर्धेची प्रवेश फी  QR CODE द्वारे अदा करण्यात यावी* स्पर्धेतील प्रवेश अर्ज स्वीकारण्याची *अंतिम तारीख 02 डिसेंबर 2024* तर स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संस्थेचे कार्यवाह श्री.शरद सावंत यांच्या *9422584054* या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा तसेच या चळवळीने उद्दिष्ट पूर्तेकडे वाटचाल करावी यासाठी जास्तीत जास्त संघानी आपला सहभाग या स्पर्धेच्या खुल्या व शालेय गटामध्ये नोंदवून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. एन. आर. देसाई यांनी केले आहे.