
मंडणगड : शहरातील दुर्गवाडी येथे 27 मार्च 2025 रोजी नृत्य नटराज अकॅडमी सुरु करण्यात आली. वाकवली गावचे सिद्धार्थ जाधव यांनी दिनेश सापटे यांच्या इमारतीत नृत्य नटराज अकॅडमीची सुरुवात केली. या कार्यक्रमास मंडणगड नगर परिषदेचे नगरसेवक आदेश भाई मर्चंडे, मनोज पालांडे, दिनेश आपटे, साहित्यिक किशोर कासारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर सिद्धार्थ जाधव यांनी नृत्याचे प्रतीक म्हणून नटराज प्रतिमेचे पूजन केले. यानंतर धम्मचारी सत्यसिद्धी यांनी या अकॅडमी संदर्भात भूमिका मांडली. मंडणगड हळूहळू विकसित होतो आहे. आणि अशा प्रकारे नवीन संकल्पनाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर आदेश मर्चंडे, उमेश सापटे, साहित्यिक किशोर कासारे व भा.ला. टूले यांनी ही शुभेच्छा दिल्या. मंडणगड तालुक्यातील नृत्य शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी व विद्यार्थी यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना श्री. शांताराम पवार यांनी केले. विद्यार्थ्यांसाठी एक नवे दालन खुले झाल्याचे ते म्हणाले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.