सनातन धर्मरक्षक सेनेच्या प्रदेश अध्यक्षपदी नारायण सावंत

Narayan Sawant
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 19, 2023 15:38 PM
views 119  views

सावंतवाडी : सनातन धर्मरक्षक सेनेच्या राज्य अध्यक्षपदी सावंतवाडी येथील नारायण सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. प्रधानमंत्री जनकल्याणकारी जागरूकता अभियानचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री.सावंत कार्यरत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना लाभार्थ्यां पर्यत पोहचविण्यासाठी श्री. सावंत यांनी गेल्या दोन वर्षात प्रभावी काम केले आहे. त्यांच्या कामांची दखल घेऊनच त्यांच्याकडे आता सनातन धर्मरक्षक सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य विजय महाराज यांनी नुकतेच श्री. सावंत यांना नियुक्ती पत्र दिले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.