नारायण राणे यांना महायुतीची उमेदवारी | देवगड भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 18, 2024 08:40 AM
views 125  views

देवगड : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची घोषणा जाहीर करण्यात आली. त्यामुळे देवगड येथील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. देवगड येथे भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आनंद व्यक्त केला. गेल्या कित्येक दिवसांपासूनचा हा तिढा एकदाचा सुटला आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागे साठी शेवटी महायुतीकडून  नारायण राणे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.भाजपच्या या १३व्या यादीत श्री राणे यांच नाव जाहीर झालं. आणि  देवगड तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी एकच  जल्लोष केला.राणे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं,अब की बार ४००पार,आदी घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या यावेळी देवगड तालुका भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.