'भाईं'नी घेतली 'दादां'ची भेट !

नववर्षाच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळात भूवया उंचावल्या
Edited by:
Published on: January 01, 2025 18:13 PM
views 612  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांंची माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी भेट घेतली. राजकीय वर्तुळात एकमेकांचे विरोधक असणारी ही व्यक्तिमत्त्व भेटल्यान राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. या भेटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व दोडामार्ग एमआयडीसीबाबत चर्चा झाल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले.

माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली. दोघांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या भेटीत प्रवीण भोसले यांनी सावंवाडीतील मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी लवकर कार्यरत होण्याबाबत खासदार नारायण राणे यांना विशेष लक्ष द्यावे अशी विनंती केली. यावेळी दोडामार्ग येथील एमआयडीसीत आणखीन जमिन घेउन तेथे हॉस्पिटलसाठी लागणारी मशिनरी निर्माण करण्याचा प्रकल्प उभा करुन सिंधुदुर्गातील हजारों तरुणांना नोकऱ्या मिळतील असा विश्र्वास खासदर राणे यांनी व्यक्त केल्याचेही माजी राज्यमंत्री भोसले यांनी सांगितले. यावेळी सतिश सुराणा व संतोष कोठारी उपस्थित होते. 

खा. नारायण राणे व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्यातील विरोध आजवर सिंधुदुर्ग जिल्ह्यान पाहिला. त्यात दीपक केसरकर व प्रवीण भोसलेंच नातही सर्वश्रुत आहे. आज दहा वर्षांनी राणे-केसरकर पुन्हा एकत्र आलेले असताना प्रवीण भोसले यांच्याकडून राणेंची घेतलेली भेट राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही भेट झाली हे विशेष.