
सावंतवाडी : निलेश, नितेशसह केसरकर ५० हजारहून अधिकच्या मताधिक्याने विजयी होतील. निलेश, नितेश तर विरोधकांच डिपॉझिट जप्त करतील. केसरकरांनी मनावर घेतलं तर इथेही तेच होईल. नाहीतर मी मनावर घेतलच आहे. महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला. भाजपच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिन्ही जागा निवडून आणण्यासाठी मी सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांनी निर्धार केला आहे. सर्वाधिक मताधिक्याने महायुतीचे तिन्ही उमेदवार विजयी होतील. केसरकर प्रवक्ते, मंत्री आहेत. त्यांच्याकडे चांगल्या कामाचा अनुभव आहे. नकोती काम त्यांनी केली नाहीत. दुसरीकडे काहीजण एबी फॉर्म शोधत फिरत आहेत. सगळंच आज बोलणार नाही. टप्प्या टप्प्यात सगळं बाहेर काढणार असा इशारा त्यांनी दिला. तसेच तिन्ही पक्ष एकत्र असताना आम्ही जिंकणार आहोत. लोककल्याणकारी राज्य आणण्यासाठी आम्ही एकत्र आहोत.
राजन तेली कुठे राहतात ? ते कणकवलीत होते. सध्या सावंतवाडीत असतील तर दोडामार्ग, कर्नाटक करत आऊट होतील. त्याची माझ्यावर बोलण्याची पात्रता नाही. तेली कुतघ्न आहेत. उपरकरवर बोलण्याची सोय नाही. जिल्ह्यासाठी यांचं योगदान नाही. माझ्याच गाडीतून फिरणारे फक्त प्रसिद्धीसाठी माझ्यावर टीका करत आहेत. महायुतीचे तिघेही उमेदवार ५० हजार हून अधिक मताधिक्याने विजयी होतील. निलेश, नितेश तर डिपॉझिट जप्त करतील. दीपक केसरकरनी मनावर घेतलं तर इथेही तेच होईल. विरोधांच्या लोकच सोबत नसल्याने इथेही तेच होईल. तोडपाणी करणाऱ्याला थारा देणार नाहीत. अन् केसरकरांनी मनावर घेतलं नाही तर मी मनावर घेतल आहे. सावंतवाडीत तेली राहतो ती जागा मी ऑफिससाठी घेतली होती. त्यामुळे जास्त तोंड उघडलं तर २३ नोव्हेंबरनंतर आपलं काम सुरू होईल, समजवण्याच असा इशारा राणेंनी दिला. यावेळी भाजपच्या महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा संघटक महेश सारंग आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.