
मुंबई : भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांची ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे शिवसेना उबाठा गटात जोरदार खळबळ उडाली आहे.
एकेकाळचे माजी केंद्रीय मंत्री राणेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असलेले शिवसेना (उबाठा) उपनेते गौरीशंकर खोत काही वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहेत. मात्र, अचानक शनिवारी 22 जून रोजी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्वसंध्येला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात गौरीशंकर खोत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या भेटीची चर्चा सर्वत्र रंगली आहे.