
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्याचे निर्माते व महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयात दोडामार्ग तालुका वासियांचं योगदान मोठं असायला हवे, तालुका निर्मिती मुळे येथील लोकांचे कित्येक जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना मत म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील जनतेला ऋण फेडण्याची संधी असून येथील जनतेने ना. राणे यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी केले.
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी महायुतीच्या वतीने दोडामार्ग तालुक्यात गावोगावी कॉर्नर सभा घेत महायुतीच्या पदाधिकारी यांनी उमेदवार राणे यांचा प्रचार केला. या प्रचार वेळी संध्याकाळी पिकुळे मधली वाडीत येथे झालेल्या सभेत श्री. दळवी बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, भाजपाचे सेनेचे तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा संघटक गोपाळ गवस, शैलेश दळवी, संदीप गवस, उप तालुका प्रमुख तिलकांचंन गवस, विठोबा पालयेक, युवा सेना प्रमुख भगवान गवस, सरपंच आपा गवस, सरपंच अनिल शेटकर, माजी सरपंच दिक्षा महालकर, महीला सेना प्रमुख चेतना गडेकर, मनीषा गवस संदीप दळवी, सुभाष गवस आदी उपस्थित होते. यावेळी अन्य गावांतील सभाना आरपीआयचे रमाकांत जाधव, राजन म्हापसेकर, दयानंद धाऊसकर, रामदास मेस्त्री, चेतना गडेकर आदी उपस्थित होते.
पिकुळे गावात प्रचार सभेत बोलताना गणेश प्रसाद गवस यांनी सांगितले की, दोडामार्ग तालुका निर्मिती केली त्यामुळे यावर्षी प्रथमच त्यांना मतदान करण्याची संधी लोकसभेचे निवडणूकीत मिळणार आहे. त्यातुन त्यांना पुन्हा केंद्रीय मंत्री पदावर विराजमान होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या तयारीत सर्व युतीचे कार्यकर्ते काम करत आहेत. त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. पिकूळे गावात झालेली विकास कामे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झाली आहेत. उर्वरित कामे भविष्यात केली जातील असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी श्री. तेली यांनी, पंतप्रधान मोदी यांनी अनेक गाव पातळीवर सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक योजना केंद्राच्या माध्यमातून आणल्या याचा लाभ सर्वांना होत आहे. भारत जागतिक महासत्ता बनण्याचे दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे नारायण राणे यांना मत म्हणजे मोदींना मत. म्हणूनच मोठ्या संख्येने मताधिक्य द्या असे आवाहन त्यांनी केलं. यावेळी अन्य मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.










