
:रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण यावर उद्या होणार शिकामोर्तब होणार आहे.केंद्रीय मंत्री नारायण राणे उद्या अर्ज भरण्याची तारीख जाहीर करणार आहेत. नारायण राणे उद्या अर्ज भरण्याची तारीख जाहीर करणार असल्याचे म्हणाले आहेत.कुठाळ येथील महालक्ष्मी हाॅल येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणेनी हे विधान केले आहे. रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील युतीचा उमेदवार कोण या प्रश्नाला उद्या पूर्णविराम मिळणार आहे. अनेक दिवसांपाून रत्नागिरी सिंधदुर्ग मतदार संघातील उमेदवार कोण असेल यावर दोन्ही जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून होते.आता राणेंनी आपणच उमेदवारी दाखल करणार असल्याचे म्हटल्याने ते केव्हा अर्ज दाखल करणार हे आता ते उद्याच वेंगुर्ल्यातील दौऱ्यात सांगणार आहेत.