
दोडामार्ग : युवक रोजगार हवा म्हणून पुढे येतात पण प्रत्यक्षात रोजगार आल्यावर त्याला विरोध करतात अशी खंत केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी व्यक्त केली. मणेरी येथे तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचच्या सदस्यांनी ना. राणे यांची भेट घेतली यावेळी त्यांनी ही खंत व्यक्त केली यावेळी त्यांच्यासमवेत तालुका भाजपा पदाधिकारीही उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. राणे यांनी रोजगार निर्मिती मागणीचे कौतुक केले. जवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे याचा फायदा दोडामार्गात पर्यटक येण्यास सुलभ होणार आहे. त्यासाठी येथे पायाभूत सुविधाची निर्मिती महत्वाची आहे. तिलारीत पर्यटन होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली जाईल व विकास आराखडा बनविण्यात येईल. लवकरच मंच सदस्य आणि इतर ग्रामस्थांशी चर्चा विनिमय बैठक होईल असेही राणे म्हणाले. शिवाय मंच ने दिलेले निवेदन केवळ स्वीकारून बाजूला न ठेवता निवेदनाचे प्रकट वाचन केले आणि मंचच्या सदस्यांना सूचनाही केल्या.