
सावंतवाडी : राणे आणि केसरकर एकत्र येतील असं शाशात ब्रम्हदेवाला ही वाटलं नव्हतं. मात्र, ते घडलं. लोकसभेला दीपक केसरकर यांनी राणेंना साथ देत त्यांच्या विजयात मोठा वाटा उचलला. राणेंनी त्याची परतफेड विधानसभेत चक्रव्यूहात सापडलेल्या केसरकरांंना करत विजयाचा रिटर्न गिफ्ट देऊ केलय.
राणे आणि केसरकर हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रान पहिला. हे दोघे कधी एक होतील असं कोणालाही वाटले नसेल. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडींनंतर राणे-केसरकर एकत्र आले. लोकसभेला नारायण राणे यांना निवडून देण्यासाठी दीपक केसरकर यांनी मेहनत घेतली. सावंतवाडी मतदारसंघातून ३२ हजारांच लीडही दिलं. त्यानंतर विधानसभा जाहीर झाली. महायुतीला सावंतवाडीत बंडखोरीचा फटका बसला. केसरकरांना चहूबाजूंनी घेरल गेलं. अशावेळी राणे पितापुत्रांनी केसरकर यांना साथ दिली. गांधी चौकातील भर सभेत लोकसभेची परतफेड केसरकर यांना करणारा असल्याची घोषणा राणेंनी केली. दस्तुरखुद्द माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी केसरकरांसाठी ताकद लावली. विधानसभा निवडणूकीत चक्रव्यूहात अडकलेल्या केसरकरांनी तब्बल ३९ हजारांच मताधिक्य घेऊन दणदणीत विजय प्राप्त केला.
चहुबाजूंनी घेरलेले असताना केसरकरांनीही आपला राजकीय अनुभव पणाला लावत विरोधकांना धूळ चारली. केसरकरांच्या विजयानंतर राणेंनी विजयाच रिटर्न गिफ्ट त्यांना दिल्याचे बोलले जात आहे.