नवनिर्वाचित उपसभापती सोनू सावंतांचे नारायण राणेंनी केले अभिनंदन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 20, 2026 12:22 PM
views 56  views

कणकवली : कणकवली पंचायत समितीचे नवनिर्वाचित उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत यांनी गुरुवारी, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांची ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी सोनू सावंत यांचे उपसभापतीपदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदन केले. कणकवली तालुक्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन राणे यांनी सावंत यांना दिले. 

याप्रसंगी भाजप पदाधिकारी संदीप कुडतरकर, दादा साईल, माजी सभापती तुळशीदास रावराणे आदी उपस्थित होते. सोनू सावंत हे भाजपतर्फे वरवडे पंचायत समिती मतदार संघातून बिनविरोध विजयी झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी भाजपचे तालुका उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांच्या पत्नी राधिका सावंत यादेखील यापूर्वी वरवडे पंचायत समिती मतदार संघाच्या सदस्या होत्या. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसभापती म्हणून जास्तीतजास्त चांगले काम करणार असल्याचा निर्धार सोनू सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.