
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आचरा मार्गावर ऑटो रिक्षाला समोरून येणाऱ्या लक्झरी बसने जोरदार धडक दिलेल्या दुर्घटनेत आपला उजवा पाय गमवावा लागलेल्या रुद्र धोंडू घाडी, वय वर्ष १० या मुलाला महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी रूद्रला मोठा आधार दिलाय. नारायण राणे यांच्या आरोग्यसेवेचे काम पाहणारे कार्यकर्ते झाहिद खान व फॅमिदा पनवाला यांच्या आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुद्र याला नवीन कृत्रिम पाय बसवण्यात आला असून आज रूद्र घाडी व त्यांच्या आई-वडिलांनी मुंबई येथली निवासस्थानी नारायण राणे व सौ. निलम राणे यांची भेट घेतली. यावेळी घाडी कुटुंबाची विचारपूस करत त्यांना नारायण राणेंनी आर्थिक मदत केली.