
सिंधुदुर्ग : खास दिवस खासदारांचा...अशा टॅगलाईन खाली खासदार नारायण राणेंचा वाढदिवस पार पडला. हजारोंच्या उपस्थितीत केक कापत खासदार नारायण राणेंनी वाढदिवस साजरा केला.
साथ चांगली असली की प्रवास चांगला होतो. 73 कधी गाठलं कळलंच नाही, याला कारण फक्त नीलम राणे. आज तिच कौतुक करतो. माझ्या आवडी निवडी, आजरपण, कुठली गोळी घायची हे सांगणारी डॉक्टर आहे ती.मी हे अशा साठी सांगतोय की इकडच्या महिलांनीही तेच करायला पाहिजे. अशा शब्दात नीलम ताई राणेंच भाषणाच्या सुरुवातीला खासदार नारायण राणेंनी कौतुक केलं.
मला मित्र आणि सहकारी चांगले मिळालेत. कठीण काळात मित्र नसतात म्हणतात, मात्र माझ्या सोबत राहणारे असे मित्र, कार्यकर्ते महाराष्ट्रात फक्त नारायण राणेंकडे आहेत, असे भावोद्गार त्यांनी काढले. मुख्यमंत्री पदाच्या काळातील आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. हायवेच सुशोभीकरण व्हायला हवं अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. सिंधुदुर्गात उद्योगधंदे आले पाहिजेत. गरिबी असता नये. सिंधुदुर्ग समृद्ध बनेल त्याच माझ्यासाठी शुभेच्छा असतील, अशा भावना खासदार नारायण राणेंनी व्यक्त केल्यात.