
मालवण : महायुतीचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचा मेळावा मालवण येथे होतं आहे.
खासदार नारायण राणे म्हणाले, भाजपा शिवसेना शिंदे गट यांची निवडणुकी नंतरही एकजूट असायला हवी. राज्यात आपलीच सत्ता येणार आहे. दोघांनी एकत्र येऊन विकासकामे करायची आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत घेऊन जाणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 लोककल्याणकारी योजना आणल्या. औषधामध्ये उद्धव ठाकरे यांनी 15 टक्के कमिशन खाल्ले. उद्धव ठाकरेंना जाहीर सभेत उत्तर देणार आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी राज्यात सत्ता हवी. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य दिले. आयुष्यमान योजना आणली. मोदींनी 12 कोटी लोकांना पक्की घरं दिलं. दोडामार्गला कारखाने आणणार. त्यासाठी चौदाशे एकर जागा शिल्लक ठेवली आहे. जिल्ह्यातील बेरोजगारी शिल्लक ठेवणार नाही. कोकणातील सर्व जागा आल्या तर विकास काय असतो तो बघा. कार्यकर्त्यांनी झटून काम केले पाहिजे. पदासाठी काम करू नका. काम असे करा कि पद तुमच्याकडे चालून आले पाहिजे. अनेकांना पदे दिली. मात्र ते आज दिसत नाहीत. तीनही जागा निवडून यायला हव्यात. निलेश राणे 50 हजारहून अधिक मतांनी निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन काम करावे. शिवसेना वाढवली आम्ही आणि हा आयत्या बिळावर आला अशी टीका राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरेंनी एखादी शाळा, कॉलेज काढलं का? उद्धव ठाकरे यांची शिवसेना आवळत चालली आहे. लाडकी बहीण योजना बंद करणार म्हणून उद्धव ठाकरे सांगत आहेत. उद्धव ठाकरे, शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना का नाही सुरु केली?
मी कधी जात, धर्म पाहिला नाही. कार्यकर्त्यांवर आमचा बारीक लक्ष आहे. विरोधक असतील तरी त्यांच्याकडे प्रचाराला जा. मोठ्या मताधिक्याने विरोधकांना पाडूया असा निर्धार नारायण राणे यांनी केला.