
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरतायत. त्यापूर्वी सभा सुरु आहे. यावेळी खासदार नारायण राणे बोलत होते.
खासदार नारायण राणे म्हणाले, काल नितेशनी तापवले आज केसरकर तापवत आहेत. विचारांनी तापलेला मतदार असावा यासाठी असं आयोजन असेल. केसरकरांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बघता ही निवडणूक जिल्हा परिषदची वाटत आहे. आमच्या नेत्यांची पिशवी धरणारे राजन तेली उबाठाचे उमेदवार आहे. टक्केवारीत सहभाग असणारे ते आहेत. कणकवलीहून सावंतवाडीत का आले ? ते ठावूक नाही. जनसेवा, लोकसेवेत त्यांच योगदान काय आहे ? कधी कोणाला चार पैशांची मदत केली का ? असा सवाल नारायण राणेंनी केला.
पावसात बेडूक उड्या मारतो तसा राजन तेली निवडणूक आली की उड्या मारतो. आमची युती महाराष्ट्रात अडीच वर्षांत सत्तेत आहे. आमच्या पंतप्रधानांनी देशात व सरकारने राज्यात केलेली काम बघा. देशात क्रांती करणारी आमची महायुती आहे. कोरोनात मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी औषधात पैसा खाल्ला असा आरोप राणेंनी केला. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांसाठी काम करत आहेत. विरोधकांनी लोकांचं शोषण केलं. त्यामुळे अशा लोकांना आता थार देऊ नका. ४० हून अधिक योजना मोदींनी देशाला दिल्या. दीपक केसरकर यांच्या कामाची पोचपावती मागायला आम्ही आलो आहोत. जिल्ह्याच दरडोई उत्पन्न वाढलं आहे. जिल्ह्यातील प्रगतीत दीपक केसरकर यांचही मोठं योगदान आहे. योग्य माणूस निवडल्यास पुढच्या पाच वर्षांत समृद्धी येईल. लोकसभेत मला निवडून दिलत तुमचे ऋण विसरणार नाही. खासदार म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे.
समोरच्या दोघा उमेदवारांनी एखादी बालवाडी तरी काढली का ? काय काम केलं ते सांगाव. त्यांना फुकटच श्रेय घेण्याची सवयच आहे. केसरकर, निलेश, नितेश निवडणूकीच्या रिंगणात आहेत. काही उमेदवार पैसा वाटत आहेत. त्यांची फॅक्टरी कुठे आहे ते विचारा. दोन नंबरचे धंदे यांचे आहेत. विशाल परब यांची तक्रार घेऊन काही लोक दिल्लीत आलेले. ब्राऊन शुगरचा सप्लायर कोण ? याच नाव पोलिसांंनी जाहीर करावं. तसेच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना पुन्हा राज्यात मंत्री होण्यासाठी पुन्हा आशीर्वाद द्या. जेलमध्ये राहिलेल्या लोकांना जागा दाखवा असं विधान राणेंनी केलं.