नारायण राणेंना सर्वाधिक लीड मिळेल : अशोक दळवी

Edited by: विनायक गांवस
Published on: May 02, 2024 06:11 AM
views 56  views

सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात मोठा पाठिंबा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मिळत आहे. पाचही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकदिलाने कार्यरत आहेत. ग्रामीण भागासह शहरातून सर्वाधिक लीड हे राणेंच्या मागे असेल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला‌. 

दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांमुळे जनता आमच्यासोबत राहील. त्याची पोचपावती राणेंना मिळणाऱ्या मताधिक्यातून असेल असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केले.