नारायण राणे यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर होणार !

Edited by: भरत केसरकर
Published on: April 18, 2024 05:02 AM
views 384  views

कुडाळ: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आज दुपारी बारा वाजता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी जाहीर होणार आहे. यानंतर नारायण राणे मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील श्री देव रामेश्वराचे दर्शन घेणार आहेत.

हे दर्शन घेतल्यावर नारायण राणे मिडीयाशी संवाद साधणार आहेत. थोड्याच वेळात नारायण राणे कणकवलीहून कांदळगाव च्या दिशेने रवाना होणार आहेत.