लैंगिक अत्याचार प्रकरणी नांदगावातील तरुण ताब्यात

पुणे-निगडी पोलिसांची कारवाई
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 24, 2023 18:15 PM
views 77  views

कणकवली : लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे - निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या संशयित कमलेश सुरेश मोर्ये ( ३९, रा. नांदगाव तिठा) याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले. हि कारवाई निगडी पोलिसांनी व कणकवली पोलिसांनी शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास केली.

कमलेश मोर्ये याला राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पुणे - निगडी येथे घेऊन गेले. या कारवाईमध्ये निगडी पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी नागरगोजे, शिपाई दीपक जाधव तसेच कणकवली पोलीस ठाण्याचे शिपाई उद्देश कदम आणि होमगार्ड सहभागी झाले होते.