
कणकवली : नांदगाव ग्रामपंचायत वर पुन्हा भाजप पुरस्कृत पॅनलचा विजयी होणार असल्याचा दावा सरपंच पदाचे उमेदवार रविराज मोरजकर यांनी करत सकाळीच प्रथम मतदानाचा हक्क बजावला आहे. नांदगाव येथील मतदानाला शांततेत सुरुवात झाली असून ग्रामस्थ देखील उत्स्फूर्त मतदान करताना दिसून येत होते. त्यामुळे निवडणूक यंत्रणा देखील सज्ज असल्याचे दिसत होते.