
सावंतवाडी : इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंचपदी नमिता नंदू नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. इन्सुली ग्रामपंचायतीच्या सौ वर्षा सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज नमिता नंदू नाईक यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी भाजपा पक्षाच्यावतीने माजी शिक्षण आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, बांदा भाजपा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन नाईक त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सभापती मानसी धुरी, माजी सरपंच विठ्ठल पालव, विकास संस्था चेअरमन श्री. परब, माजी चेअरमन हरिश्चंद्र तारी, अशोक सावंत, उमेश पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ता खडपकर, वर्षा सावंत, महेश धुरी, महेंद्र पालव, प्रताप सावंत, संजय सावंत, अमेय कोठावळे, नागेश सावंत, औदुंबर पालव, नंदू नाईक, श्री. सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.