नाम.‌ भाईसाहेब सावंत यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण !

Edited by:
Published on: February 03, 2025 19:33 PM
views 8  views

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान सावंतवाडी आयोजित लोकनेते नामदार स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण व स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या ४ फेब्रुवारीला सावंतवाडी येथे हा सोहळा संपन्न होणार असून दिग्गज मान्यवर या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत.

लोकनेते नामदार स्व. भाईसाहेब सावंत यांच्या १०१ व्या जयंती निमित्त अर्धाकृती पुतळा अनावरण करण्यात येणार आहे‌. माजगाव येथे 'प्रेरणा' सभास्थळी स.९.३० ला पुतळा अनावरण व आदरांजली वाहिली जाणार आहे. तदनंतर १०.३० वा. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात स्मरणिका प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप असणार असून माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर, माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, आम. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास सावंत, शि.प्र.मंडळाचे सचिव व्ही. बी.नाईक, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, अमोल सावंत, डॉ. दिनेश नागवेकर आदींनी केले आहे.