
सावंतवाडी : न्हावेली येथील सध्या कार्यान्वित असलेल्या बीएसएनएल टॉवरचा येथील ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे. गेले काही महिने गावातील या टॉवरचे नेटवर्क बंद पडत आहे.लाईट गेली की टॉवर बंद पडत असतो.तसेच नेटवर्क गायब झाल्याने याचा फटका येथील बीएसएनएल ग्राहकांना आर्थिक स्वरूपात बसत आहे.त्यामुळे येथील इन्व्हर्टर बॅटरी बदलून ती सुस्थितीत आणावी.
वारंवार होणाऱ्या या मनस्तापामुळे येथील ग्राहक वैतागला आहे.इर्मजन्सी एखादा कॉल करायचा झाला तर नेटवर्क अभावी कॉल लागत नाही.तसेच केलेले रिचार्ज चे पैसे वाया जातात. याची दखल घेत मनसे व ग्रामस्थांच्या वतीने सावंतवाडी येथील याची दखल बीएसएनएल जिल्हा प्रबंधक भारत संचार निगम,सावंतवाडी येथील कार्यालयात जाऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात बीएसएनएल टॉवर बाबत असणाऱ्या त्रुटी संदर्भात आक्रमक पवित्रा घेत निवेदन दिले आणि लवकरात लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेऊन व पंधरा दिवसात इन्व्हर्टर बॅटरी बसवून देऊ असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला.व सुरळीत करावी. अन्यथा न झाल्यास मनसे व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष तथा न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर,सावंतवाडी विधानसभा मनसे संपर्क अध्यक्ष महेश परब,मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, मनसे तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, नवनाथ पार्सेकर, कमलेश नाईक आदी उपस्थित होते.