इथं केली जाते नाग-नागिणीची पूजा

Edited by: विनायक गावस
Published on: August 21, 2023 16:24 PM
views 905  views

सिंधुदुर्ग : माणगाव येथील जिनदास बोगार हे सोमवंशीय जैन समाजातील असून नागपंचमीला नाग आणि नागीण अशा मूर्तीची पूजा करतात. सोमवंशीय जैन समाजात नागाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

देव आणि देवता यांचे ज्याप्रमाणे पूजन केले जाते त्याचप्रमाणे नाग आणि नागीण यांची पूजा सोमवंशीय जैन समाज करतो. माणगाव मध्ये बोगार यांची चौथी पिढी ही परंपरा जोपासत असून पूर्वीचे त्यांचे आडनाव दिडपैसे असे होते. हिंदू धर्माप्रमाणे नागपंचमीस नाग-नागिणीची आणि चतुर्थीला गणपतीची मनोभावे पूजा करतात.