
कुडाळ : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी बांबर्डे शिवसेनेच्या विभागप्रमुखपदी नागेश आईर यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल निवती गावात शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
नागेश आईर यांच्या निवडीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सत्कार समारंभावेळी गावातील कार्यकर्त्यांनी आईर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सीताराम चव्हाण, विठ्ठल गवळी, साईनाथ पालव, निळकंठ लाड, सचिन पालव, किरण जाधव, महेंद्र पालव, विजय जाधव, दत्तात्रय पालव, विकास जाधव, संतोष चव्हाण, तातू लाड, पांडुरंग तळेकर, रामचंद्र चव्हाण आणि लक्ष्मण कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडीमुळे बांबर्डे आणि परिसरातील शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.