
सावंतवाडी : तळवडे - बादेवाडी येथील नागेश दळवी याची वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी पॅरा कमांडो स्पेशल फोर्ससाठी अभिमानास्पद निवड झाली आहे.
नुकतीच ही निवड झाली असून त्याचा महेंद्रा अकॅडेमीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार असल्याचे महेंद्र पेडणेकर यांनी कळविले आहे.
नागेशच्या या अभिनंदनीय निवडीबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
यापूर्वी नागेशने अग्निवीर भरतीसाठी मैदानी चाचणीत 100 पैकी 100 गुण मिळवून निवड चाचणीत यश मिळवले होते. तसेच लेखी परीक्षेत देखील नागेशने चांगले गुण मिळविल्यामुळे त्याला पुढे पॅरा कमांडो चाचणीसाठी टार्गेट देण्यात आले. ते टार्गेट त्याने यशस्वीपणे पार केल्याने त्याची आता पॅरा कमांडो म्हणून निवड झाली आहे.