वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची नागझरवाडी ग्रामस्थांची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: November 20, 2025 17:15 PM
views 85  views

सावंतवाडी : नागझरवाडी परिसरात वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे सातत्याने नुकसान होत असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शेती आणि बागायती पिकांवर गवा-रेड्यांच्या कळपाने हल्ला चढवत मोठे नुकसान केले. आधीच अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांचा आणखी एक ञास सहन करावा लागत आहे. यामुळे तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

या घटनेची पाहणी करण्यासाठी शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख तथा न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर, नुकसानग्रस्त शेतकरी पांडुरंग विठ्ठल सावळ, प्रकाश पांडुरंग सावळ, वनाधिकारी प्रकाश रणगिरे, तसेच ग्रामस्थ राज धवन व नवनाथ पार्सेकर यांनी नुकतेच शेताला भेट दिली.

युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेत असून, आतापर्यंत न्हावेली गावासह आजूबाजूच्या गावातील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लाखो रुपयांची मदत मिळवून दिली आहे. संकटसमयी धावून येणाऱ्या पार्सेकर यांच्या सहकार्याबद्दल न्हावेली पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.शेतकरी वर्गाने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.