व्हायरल व्हिडिओनंतर नगरपंचायतचा इशारा

कणकवली शहरातील फळ विक्रेत्यांची बैठक
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 27, 2023 10:59 AM
views 248  views

कणकवली : कणकवली शहरात काही दिवसांपूर्वी एका फळ विक्रेत्याकडे अस्वच्छ फळे विक्री केली जात असल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची दखल कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाने घेतली. कणकवली शहरातील फळ विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात आल्या. अस्वच्छ असलेली फळे विक्री करताना आढळून आल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला. त्यांना स्वच्छते विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पटकी देवी ते पटवर्धन चौक, हायवेवर हातगाडी लाऊन रस्ता अडवू नका अशा सूचना करण्यात आल्या. यावेळी प्रशासकीय अधिकारी अमोल अगम, किशोर धुमाळे, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, सतीश कांबळे आदि फळ विक्रेते उपस्थित होते.