
दोडामार्ग : नगरपंचायतच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आय डी कार्ड घाला अन्यथा कोणताही अन्यथा कोणताही अनुचित प्रकार घडू नये. आणि ओळखपत्र घालणे बंधनकारक आहे. त्यामुळे 15 ऑगस्टला सर्वांची ओळखपत्रे दिसली पाहिजे असे नगरसेवक राजेंद्र प्रासादी यांनी सक्त सूचना केली.
कसई दोडामार्ग नगरपंचायतची सर्वसाधारण सभा अध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगरपंचायत हॉल मध्ये पार पडली. यावेळी नगरसेवक प्रसादी यांनी आयत्या वेळीचा विषय घेऊन सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ओळखपत्र घालण्या संदर्भात सक्त सूचना केल्या. यावेळी मागच्या सभेचे इतिवृत्त वाचून विकास कामांसंदर्भात आढावा घेण्यात आला. नगरपंचायत मार्फत सुरु असलेल्या कामांचा ही आढावा घेण्यात आला. ज्या ठेकेदारांनी आपले कामे वेळेत केली नसतील त्यांना मुदत वाढ देऊ नको. नियमाप्रमाणे तुकच्यावर दंडात्मक कारवाई करा. असे यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले.
चतुर्थीला एकही स्ट्रीट लाईट बंद नको.
यावेळी नगरध्यक्ष बोलताना म्हणाले की काही दिवसात गणेश चतुर्थी येणार आहे. शहरासहित नगरपंचायत हद्दीतील सर्व स्ट्रीट लाईट चालू करा. ज्या ठिकाणी लाईट नसेल त्या ठिकाणी लाईट घाला एकही स्ट्रीट लाईट मला बंद दिसता नये अश्या सक्त सूचना कर्मचाऱ्यांना केल्या.
शहरातील अंगणवाडी दुरुस्त करा : संध्या प्रसादी
दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील बऱ्याच अंगणवाडी मोडकळीस आल्या आहेत. उद्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खास बाब म्हणून पालकमंत्री यांना सांगून अंगणवाडी दुरुस्त करण्यात संदर्भात प्रस्ताव तयार करा अशा सूचना प्रसादी यांनी सांगितले.
असिसमेंट प्रमाणे तिरंगा खरेदी करा
हरघर तिरंगा या अभियानात नगरपंचायतमार्फत घरपत्रक उताऱ्याप्रमाणे नवीन तिरंगा खरेदी करा. व शहरातील सर्व नागरिकापर्यंत पोहचला पाहिजे. तसे नियोजन करा. प्रत्येक नगरसेवक व असर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या घरावर तिरंगा लावून सेल्फी फोटो काढून नगरपंचायतच्या व्हाटसप गृप वर टाका. असे चव्हाण यांनी सर्वांना सांगितले. तसेच नवीन सक्शन व्हॅन घेण्या संदर्भात नाविण्य पूर्ण उपक्रमातून प्रस्ताव तयार करण्या संदर्भात ही चर्चा करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस, शिक्षण व आरोग्य सभापती संध्या प्रसादी, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, नगरसेवक नितीन मणेरीकर, राजू प्रसादी व सर्व नगरसेविका अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.