नडगिवे स्कूलचे विद्यार्थी बनले चंद्रयान -3 चे साक्षीदार ; स्कूलमध्ये थेट प्रक्षेपण

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 14, 2023 20:23 PM
views 174  views

कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे तील विद्यार्थ्यांनी चंद्रयान 3 च्या प्रक्षेपणाचा अनुभव घेतला. विद्यार्थी या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हावेत म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत मोठया टीव्ही स्क्रीन वर हे प्रक्षेपण लाईव्ह दाखवण्यात आले. तसेच या विषयी अधिक माहिती देणारे व्हिडिओ दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनी हा भारतासाठी असलेला गौरव क्षण आनंदाने साजरा केला. विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्यासाठी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. या प्रशालेत नेहमीच  नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना हा अनुभव देण्यात आला.