नडगिवे नॅशनल इं. मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव !

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 06, 2023 19:10 PM
views 275  views

कणकवली : कणकवली नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे खारेपाटणच्या दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे चेअरमन मनोज गुळेकर यांनी यशस्वी विद्यार्थी शुभेच्छा दिल्या. 

 नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल नडगिवे खारेपाटणच्या दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे चेअरमन मनोज गुळेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलं. शुभंकर सुधीर कुबल 94.80%, प्रणील राजेश शिंदे 90.40%,अहमद अमजद मुकादम 87.60%,निशा संदीप रायका  87.60%,गंधर्व सच्चिदानंद तळेकर 82.40%,जरीफ अहमद हनिफ काजी  81.20%,जानकी किशोर सांखला 79.60 %,मुनावर गफूर पावसकर  76.40% या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. भविष्यात पालकांचे आणि शाळेचे नाव उज्वल करा. कुठलेही अडचण आल्यास आपल्याला सांगावे.शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी हा  माझ्या मुलाप्रमाणे आहे. नाव कमावत असताना मातीशी नाळ कायम जोडून ठेवाम, असा सल्ला गुळेकर यांनी दिलाय. यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं चेअरमन मनोज गुळेकर यांना स्केच केलेले चित्र भेट म्हणून दिले.  

तसेच प्रिन्सिपल कौस्तुभ देसाई यांनी देखील मुलांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. व 90% पेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील यावेळी देण्यात आली. 

यावेळी सेक्रेटरी  मोहन कावळे , सह सेक्रेटरी राजेंद्र ब्रह्मदंडे, खजिनदार परवेज पटेल,  संस्थेचे कायदेशीर सल्लागार सागर तळेकर, मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई व समन्वयक पराग शंकरदास यांच्यासह  संचालक मंडळ आणि  शिक्षक वर्ग देखिल बहुसंख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नसीम मुल्ला मॅडम यांनी केले.