महेश सावंत यांनी साथीदारांसह जिंकली उडूपीतील संगीत रसिकांची मने

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 30, 2023 19:28 PM
views 189  views

कुडाळ : कर्नाटक - उडूपी व मणिपाल येथील श्री देव उमा माहेश्वरी मंदिर येथे तेथील महेश ठाकूर यांच्या सौजन्याने तसेच उडूपी श्रीकृष्ण मंदिर येथे सोमवारी सिंधुदुर्गातील डॉ. दादा परब आणि भजनसम्राट बुवा भालचंद्र केळूसकर संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालय पखवाज अलंकार महेश सावंत (कुडाळ-सिंधुदुर्ग) यांनी आपल्या साथीदार आणि 75 पखवाज, 4 तबला, 3 ढोलकी जुगलबंदी विद्यार्थी वर्गासह तसेच संगीतमय भजनारंग सादर करुन कर्नाटक उडूपी येथील संगीत रसिकांची मने जिंकली.

     यावेळी उत्तर हिंदुस्थानी संगीताचे सादरीकरण दक्षिण हिंदुस्थान मध्ये करुन संगीत कलेतील कोकणचा झेंडा दक्षिण प्रांतात लावला याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यामध्ये पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या नेतृत्वात संगीत अलंकार गायक प्रफुल्ल रेवंडकर, युवा गायक व हार्मोनियम वादक अमित उमळकर तसेच विद्यालयाचे पखवाज विशारद दत्तप्रसाद खडपकर, सचिन कातवणकर, ओमकार वेंगुर्लेकर व तबला वादक अतुल उमळकर, साईश उमळकर, सुरज पालव, शुभम पिंगुळकर तसेच 75 पखवाज वादक विद्यार्थी कलाकार यांनी सहभाग घेतला. निवेदन अक्षय सातार्डेकर यांनी आपल्या खास हिंदी बोलीत व हटके शैलीत केले. यावेळी कर्नाटक येथे पखवाज अलंकार महेश सावंत यांच्यासह वादक कलाकारांचा आयोजकांच्या वतीने गौरव करण्यात आला.