
कणकवली : फोंडाघाट येथील श्री देव राधाकृष्ण मंदिराच्या हरिनाम सप्ताहानिमित्त आर. के. ग्रुपतर्फे ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत मंदिरात संगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेकरिता अनुक्रमे ११,१११ रु., ७,७७७ रु., ५,५५५ रु. २,५५५ रु., २,२२२ रु., व चषक अशी बक्षीसे आहेत. शिस्तबद्ध संघ १,५५५ रु., उत्कृष्ट गायक १,१११ रु., हार्मोनियम १,१११ रु., पखवाज १,१११ रु., कोरस १,१११ रु, झांज १,१११ रु. व चषक अशी वैयक्तिक बक्षीसे आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण १७ सप्टेंबरला रात्री ८ वा. होईल. संगीतप्रेमींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










