कृषी कन्यांकडून अळंबी उत्पादनाचं प्रशिक्षण

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 30, 2023 19:31 PM
views 179  views

कुडाळ : डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम 2023 अंतर्गत विद्यार्थ्यीनींनी साळेल गावच्या ग्रामस्थांना अळंबी उत्पादनाविषयी सखोल माहीती दिली. अळंबीची वाढ कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व ग्रामस्थांनी त्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला.

त्यांना मार्गदर्शन करण्यामध्ये  कु.स्नेहल कदम , सायली परब, कोमल कावले , अदीना ओरलाक्कोट्ट,सेजल जाधव, दिव्याक्षी सावंत या विद्यार्थिनींचा समावेश होता. भविष्यात आम्ही देखील अळंबीचे उत्पादन घेऊ अशी सकारात्मक ग्वाही ग्रामस्थांनी विद्यार्थ्यीनींना दिली.