बाजारपेठेत डोक्यात लाकडी फळी मारून खून

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल ; संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त
Edited by: संदीप देसाई
Published on: May 22, 2024 09:24 AM
views 2069  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी बाजारपेठेत मंगळवारी अज्ञात व्यक्तीनं सुमारे 50 वर्षीय अमर मनोहर देशमाने (रा. कोयनानगर, सातारा) याचे डोकीत लाकडी फळी मारून खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास करत असून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. 

    या खुनाची माहिती आवाडे गावचे पोलीस पाटील प्रकाश महादेव देसाई यांनी दिली. त्यानुसार अज्ञाता विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साटेली भेडशी  येथील वामन संकुल या इमारतीच्या मधल्या पॅसेजमध्ये हा प्रकार 21 मे रात्री साडे नऊ ते 22 मे रोजी सकाळी  07.00 चे मुदतीत घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी भादवी कलम 302 नुसार अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस निरिक्षक निसर्ग ओतारी पुढील तपास करत आहेत. 


दरम्यान खूनाचा गुन्हा साटेली - भेडशी येथे घडल्याची माहिती मिळतात जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रावल कृषिकेश यांसह, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी घटनस्थळाला भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांची फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी दाखल होत आवश्यक नमुने व पुरावे ताब्यात घेतले आहेत.