ठेकेदारांना पोसण्याचं नगरपरिषद करतेय काम ; अण्णा केसरकरांचा आरोप

Edited by: विनायक गावस
Published on: June 22, 2023 20:24 PM
views 112  views

सावंतवाडी : नगरपालिकेत विविध प्रकल्पांच्या परीक्षण आणि विकासाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून  ठेकेदारांना पोसण्याचे काम करून नगरपरिषदेनं जनतेच्या पैशाची लूट केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी  पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात त्यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेली कागदपत्रे सादर केली.


ते म्हणाले, बंद प्रकल्पांवरही खर्च दाखवण्यात आला आहे.  ही उधळपट्टी म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. आता यापुढे पालिकेतील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात येणार असून नागरिकांनी बोध  घ्यायचा आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाला भाग पाडू असे केसरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी दीनानाथ बांदेकर सोनाप्पा लाखे प्रसाद अरविंद कर उपस्थित होते. 


सावंतवाडी नगरपरिषदेने जिमखाना मैदान व डॉक्टर स्वार यांच्यासमोरील मैदानाचे परीक्षण करण्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे. दर महिन्याला लाखो रुपये खर्च केले जात आहेत. यात कोणते परीक्षण व विकास केला जात आहे हे अनाकलीय आहे. स्वार यांच्या समोरील मैदानावर नगरपालिका कोणते काम करते असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. या मैदानावर कुठलेही काम केले जात नसताना पैसा कसा खर्च केला जातो याच आश्चर्य वाटते. 


जिमखाना मैदानावरही असाच खर्च दाखवण्यात आला आहे. मैदानावर पालिका याशिवाय खर्च करत असते. खेळपट्टीसाठी पैसा खर्च घातला जातो. खर्चाची उधळपट्टी होत आहे. हीच बाब बंद असलेल्या हेल्थ पार्क प्रकल्पाबाबत आहे. या ठिकाणी लाखो रुपये खर्च केले जात आहे. बंद असलेल्या प्रकल्पावर खर्च केला जात आहे. ही जनतेच्या पैशाची लूट आहे. नगरपरिषदेच्या विविध प्रकल्पांच्या रक्षणासाठी सेवा पुरवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहे. पालिकेचे अस्तित्वात असलेले कर्मचारी असताना हा खर्च केला जात आहे. ही गंभीर बाब आहे जनतेच्या पैशाची ही लूट आहे. ठेकेदार पोसण्याचे काम केवळ पालिका करत आहे. आज नागरिकांना पाणीटंचाई भासत आहे. वर्गणी भरावी लागते म्हणून पालिका सुधारित योजना आतापर्यंत नाकारात आली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विनाकारण पैशाची उधळपट्टी केली जात आहे. जनतेच्या जखमेवर मीठ चालण्याचे काम पालिका करत आहे. शहरात पालिकेने वाचन कट्टे सुरू केले आहेत. परंतु, हे वाचन कट्टे बंद अवस्थेत आहे. त्यांच्यावरही खर्च केला जात आहे. पालिकेतील शिव उद्यान बाबतही एक गोष्ट घडत आहे. सुमारे अडीच लाख रुपये ते खर्च केले जात आहेत. यातून काही निष्पन्न होत नाही किती जणांना रोजगार मिळाला हा प्रश्न आहे. माहितीच्या अधिकारातही किती जणांना रोजगार मिळाला ही माहिती देण्यास टाळाटाळ केलीजात आहे. यातूनच ही बाब स्पष्ट होत आहे पालिकेत चाललेला भ्रष्टाचार गंभीर मुद्दा आहे. याकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे त्यामुळे या प्रश्न आपण लक्ष घातला असून भ्रष्टाचार जनतेसमोर टप्प्याटप्पाने उघड करू याबाबत चौकशीची आम्ही मागणी करणार आहोत आणि दोषींवर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. 

भविष्यात जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे जनतेने आता सावध राहिले पाहिजे असेही केसरकर म्हणाले. सध्या मिळालेल्या माहितीनुसार एक कोटी चाळीस लाखाहून अधिक खर्च करण्यात आला आहे. यातून किती परीक्षण आणि विकास झाला हे पहाण  आवश्यक आहे.