
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी 6, नगरसेवकपदासाठी 56 दाखल झाले आहेत. या उमेदवारी अर्ज यांची आज छाननी होणार आहे. त्यासाठी सर्वच उमेदवार यांचे आज धाकधूक पाहायला मिळत आहे.
आजच्या दिवशी एकमेकांच्या उमेदवारी अर्जावर हरकती होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या हरकतीचे निवारण उमेदवार कशा पद्धतीने मांडणार हे देखील पहावं लागणार आहे. यावर निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.










