नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन उपाय योजना राबवावी : नितीन कुबल

Edited by: दिपेश परब
Published on: July 21, 2024 09:46 AM
views 213  views

वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरातील कुबलवाडा वाँर्ड क्र. ६ घर नं. १४७ या मातीच्या भिंती असलेल्या घराची मागील बाजूची घराच्या उजवीकडील भिंत संततधार पावसाच्या पाण्याने भिजून कोसळत आहे. त्याभागात रहाणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती बरोबर बाजूला रहाणाऱ्या नितीन कुबल यांच्या घरास व घरातील माणसांना सदरच्या भिंतीमुळे धोका निर्माण झाला आहे. 

कुबलवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आंबा बागायतदार नितीन कुबल यांच्या घराच्या डाव्या बाजूला सुमारे 3 फुट एवढ्या अंतरावर वाँर्ड नं.६ घर नं. १४७ हे मातीचे घर आहे. नितीन कुबल यांच्या स्वतः कुटुंबातील व्यक्तींचा वावर आपल्या घरात असतो. संततधार पावसाने नितीन कुबल यांच्या घरालगतची पार्सेकर नामक व्यक्तीच्या घराची भिंत कोसळत आहे. हि भिंत संततधार पावसाने पुर्ण  कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यात वित्तहानी बरोबरच जिवीतहानी हानी होण्याची शक्यता आहे. वेंगुर्ले नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन त्वरीत निर्णय घ्यावा. जर नगरपरिषदेकडून दुर्लक्ष झाल्यास अन वित्तहानी व जीवितहानी झाल्यास मुख्याधिकारी व नगरपरिषद प्रशासनास जबाबदार धरण्यात येईल. अशी सामाजिक कार्यकर्ते नितीन कुबल यांनी स्पष्ट केले आहे.