
देवगड : मुणगे येथे सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती त्या निवडणुकीत अंजली सावंत यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रभारी सरपंच आणि उपसरपंच संजय घाडी, सद्स्य धर्माजी आडकर, रवीना मालाडकर, परिता नाटेकर यांनी साथ देत सरपंच म्हणून निवडणूक अधिकारी राठोड यांनी घोषित केले.
मी बिनविरोध सरपंच आणि मुणगे गावची प्रथम नागरिक म्हणून मला बहुमान मिळाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची शतशः ऋणी आहे. आपल्या सगळ्यांची साथ अशीच कायम माझ्यासोबत राहू देत. मुणगे गावचा विकास कामासाठी मी नेहमीच कटिबद्ध आणि प्रयत्नशील राहीन असा विश्वास यावेळी अंजली सावंत यांनी दिला.