
सिंधुदुर्गनगरी : वाढवण बंदराच्या विकासामुळे संपूर्ण कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या वाढवण बंदरासाठी आवश्यक असणारा कुशल कर्मचारी तयार करण्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रानी तयार करावा यासाठी प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सर्व प्राचार्यांची व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख अनिल मोहेर यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथे बैठक झाली.
सागरी किनारपट्टीवर असलेल्या वेंगुर्ला मालवण व देवगड या तीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्रस्ताव तयार करावेत. व त्या ठिकाणी हे अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आवश्यक कर्मचारी मनुष्यबळ व इमारतींची स्थिती याबाबत अहवाल द्यावा असे निर्देश देण्यात आले. या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य या बैठकीला उपस्थित होते.