
सावंतवाडी : शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ साठी मुंबई विद्यापीठाच्या सिंधदुर्ग उप परिसराच्या अंतर्गत समाजकार्य (एम. एस. डब्ल्यू.) व एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सावंतवाडी येथे सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी https://muadmission.samarth.edu.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज ०३ जून २०२५ या अंतिम दिनांक पूर्वी भरावयाचा आहे.
सदर अभ्यासक्रमांच्या अधिक माहितीसाठी ९४२३८००५०५, ९९६७५६९५८५, ९४२१४८७५९२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा अथवा सिंधुदुर्ग उप-परिसर, मुंबई विद्यापीठ,मा.बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी,जिमखाना मैदान जवळ,सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग -४१६५१० या कार्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश त्वरित निश्चित करण्याचे आवाहन प्रभारी संचालक, सिंधुदुर्ग उपपरिसर यांच्या द्वारे करण्यात आले आहे.