अतिक्रमण त्वरीत हटविण्याबाबत उपोषण

Edited by: विनायक गांवस
Published on: August 15, 2023 18:52 PM
views 158  views

सावंतवाडी : घरासमोरील येण्या- जाण्यासाठी सोडलेल्या वाटेवरील केलेले अतिक्रमण त्वरीत हटविण्याबाबत निंबाळकर पीर जवळील शब्बीर इस्माईल शेख व कुटुंबियांनी स्वातंत्र्य दिनी सावंतवाडी नगरपरिषदेसमोर उपोषण छेडले आहे. या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते अँड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, रफिक शेख, बाबल्या दुभाषी यांनी भेट देत पाठिंबा जाहीर केला. नगरपालिका प्रशासन नगरपालिका कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी गरीबांवर अन्याय करत असल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्ते शब्बीर इस्माईल शेख यांनी केला आहे. याप्रसंगी रफिक शेख, बाबल्या दुभाषी, अल्ताफ मुल्ला यांसह उपोषण कर्त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.