सीओ जयंत जावडेकरांची बदली

Edited by: विनायक गांवस
Published on: May 18, 2023 20:19 PM
views 168  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची बदली झाली असून त्यांच्या बदली मूळे रिक्त झालेल्या जागी ठाणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे हे रुजू होणार आहेत. प्रशासकीय राजवटीतील जयंत जावडेकर यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. काही निर्णयांमुळे नागरिकांशी प्रशासनाचा संघर्ष झाला होता. आज अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान, नुकताच सावंतवाडी जिमखाना येथील स्विमिंग पूलमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. यांला सीओ जावडेकर व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर जावडेकर यांची बदली झाल्यानं याप्रकरणाबाबत प्रशासन कोणती भुमिका घेत याकडे शहरवासियांच लक्ष लागून राहिले आहे.