न.प.च्या जागेत विनापरवाना गटार बांधकाम ; बाळा बोर्डेकरांनी वेधलं सीओंच लक्ष

Edited by: विनायक गांवस
Published on: May 18, 2023 20:15 PM
views 183  views

सावंतवाडी : सर्वोदयनगर येथे नगरपालिकेच्या जागेत विनापरवाना गटाराचे बांधकाम निवासी इमारतीचे सांडपाणी सोडण्यासाठी होत आहे अशी तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे गणेश उर्फ बाळ बोर्डेकर यांनी केली आहे. बेकायदेशीर विनापरवाना कामास माझी हरकत असून नगरपालिकेने गटार बांधून पावसाचे पाणी व्यवस्था करणे हे काम आहे. त्यामुळे या गटाराची कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पहाणी करत या विषयाचा गांभिर्यपूर्वक विचार करून न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

 सर्वोदयनगर येथील घराशेजारी ४० मीटरपेक्षा जास्त व १ मीटर खोल १ मीटर रूंद बेकायदेशीर विनापरवाना खोदकाम पूर्ण झाले असून खाली रवाळी टाकण्याचे काम चालू आहे. या ठिकाणी निवासी संकुल असून या इमारतीत रहिवासी रहात आहेत. निवासी इमारतीचे संडास बाथरुम यांचे दुर्घधीयुक्त सांडपाणी सोडण्यासाठी निश्चित या गटाराचा वापर करण्यात येणार आहे. सध्या त्याठिकाणी रहिवासी संकुलनातील सांडपाणी येत आहे. या बेकायदेशीर विनापरवाना कामास माझी तक्रार व हरकत आहे. नगरपालिकेने गटार बांधून पावसाचे पाणी व्यवस्था करणे हे काम आहे. त्यामुळे मुख्याधिकारी किंवा कार्यालयीन कर्मचारी यांनी प्रत्यक्ष पहाणी करात या विषयाचा गांभिर्यपूर्वक विचार करून निर्णय घेत न्याय द्यावा अशी विनंती बाळा बोर्डेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.