
सावंतवाडी : मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे सावंतवाडीवासियांना दाखवलेलं हिरव गाजर आहे. आमदार होऊन १४ व वर्ष सुरू झाल परंतु, सावंतवाडीतील उप रुग्णालयात चांगले डॉक्टर देऊ शकत नाहीत ते मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल काय बनवणार ? अशी टीका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर नाव न घेता केली आहे. जर हिंमत असेल तर आहे त्या हॉस्पिटलला चांगले डॉक्टर, चांगले टेक्निशियनस् आणि चांगल्या सुविधा निर्माण करून द्या, आहे ते हॉस्पिटल हायजानीक क्लीन ठेवा. सावंतवाडीची जनता तुम्हाला दुवा देतील. परंतु हे तुम्ही करणार नाहीत असा टोला साळगांवकर यांनी लगावला आहे.